एक्स्प्लोर
Bhavina Wins Silver : पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलनं रचला इतिहास, रौप्य पदाकावर कोरलं नाव
Tokyo 2020 Paralympics : भारताच्या भविना पटेलनं टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. आपल्या पहिल्याच पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. सुवर्णपदाचं स्वप्न अधुरं असलं तरी भविनानं रौप्य पदक कमावत इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी भविना भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. दरम्यान, भविनाकडे सुवर्ण पदक कमावण्याची संधी होती. परंतु, अंतिम सामन्यात चीनच्या यिंगनं तिचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
आरोग्य
निवडणूक
व्यापार-उद्योग


















