एक्स्प्लोर

IPL 2021 : आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं काय होणार? आज फैसला

मुंबई : बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट बोर्डाची एक महत्त्वाची बैठक आज (शनिवारी) दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी सुरु होऊन अर्ध्यावरच थांबवण्यात  आलेल्या आयपीएलच्या 14 पर्वातील उर्वरित सामन्यांसंदर्भात निर्णय घेणं हे या बैठकीचं मुख्य लक्ष्य असणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचा कहर थेट आयपीएलमधील संगांपर्यंतही पोहोचल्यामुळं स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

बीसीसीआयच्या या बैठकीमध्ये येऊ घातलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषकाबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. येत्या काळात टी 20 विश्वचषकाची ही स्पर्धा युएई अर्थात संयुक्त अरब अमीरात येथे आयोजित केली जाण्याची चिन्हं आहेत. भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यानंतर 15 दिवसांनी बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्याच्या निर्णयावर पोहोचू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यास्पर्धेतील उर्वरित 31 सामन्यांचं आयोजन युएईमध्येच केलं जाणार असल्याचं चिन्हं आहे. 

आयपीएलचे उरलेले सामने 20 ते 22 दिवसांचा वेळापत्रक आखून त्यादरम्यान पूर्ण केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. डबल हेडर स्वरुपात सामन्यांचं आयोजन करण्यावर भर दिला जाणार असून या मार्गानं स्पर्धा लवकरात लवकर संपवण्यात येईल. 

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केल्यानुसार संघातील महत्त्वाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकानुसारच पुढील गोष्टींना प्राधान्य देतील. त्यामुळं इंग्लंडच्या संघातील जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, सॅम करन हे खेळाडू आयपीएलमध्ये पुन्हा सहभागी होऊ शकत नाहीत कारण त्यादरम्यानच त्यांच्या संघाचे सामने पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांशी होणार आहेत. 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. अशाच परिस्थितीत देशातील परिस्थितीवर पुन्हा एकदा लॉकडाऊनचे निर्बंध आले आहेत. असं असतानाही एकिकडे यंदाच्या आयपीएल स्पर्धा रद्द झालेल्या असतानाच बीसीसीआयकडून टी20 क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात झाल्याचं कळत आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात भारत या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार असल्याचं म्हटलं जात होतं पण, आता सर्वच परिस्थिती ही कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण कितपट अटोत्यात येतं त्यावर आधारित आहे. 

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget