IND Vs ING T20 World Cup : भारताला 2022 सालच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी
IND Vs ING T20 World Cup : भारताला 2022 सालच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी
दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा 9 विकेट्स राखून पराभव केला. अफगाणिस्तानचा डाव 11.5 षटकात 56 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने केवळ 1 गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण अफ्रिकेवर आतापर्यंत चोकर्सचा टॅग होता, तो त्यांनी पुसुन काढला आहे.
उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मारक कामगिरी केली. त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आफ्रिकन गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 56 धावांवर ऑलआउट केले. अफगाणिस्तानच्या एका फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला. अजमतुल्ला 10 धावा करून बाद झाला. सलामीवीर गुरबाजला खातेही उघडता आले नाही. इब्राहिम झद्रान 2 धावा करून बाद झाला. या सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी खराब झाली.
ट्वेन्टी२० विश्वचषकात आज भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी,भारत-इंग्लंड लागोपाठ दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत आमनेसामने.