एक्स्प्लोर
WEB EXCLUSIVE | ऑस्ट्रेलियात कोरोनाची नाही तर क्रिकेट लाट
विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या वन डेच्या निमित्तानं आज पुन्हा मैदानात उतरली. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील पहिली वन डे सिडनीच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यानिमित्तानं दिसलेला मूळ भारतीय नागरिकांचा उत्साह पाहता ऑस्ट्रेलियात कोरोनाची नाही, तर क्रिकेटची लाट आल्याचं चित्र आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या तीन वन डे आणि तीन ट्वेन्टी२० सामन्यांसाठी ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. ही सारी तिकीटं हातोहात संपली आहेत. सिडनीतल्या पहिल्या वन डेच्या निमित्तानं भारतीय प्रेक्षक वाजतगाजत स्टेडियमवर दाखल झाले. त्यामुळं तब्बल आठ महिन्यांनी एका क्रिकेट स्टेडियमवर इंडिया.. इंडिया... हा नारा निनादला.
गौरव जोशी, सिडनी
गौरव जोशी, सिडनी
आणखी पाहा























