(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli : विराटचा राजीनामा धक्कादायक! फलंदाजीवरच लक्ष केंद्रित करण्याचा Vinod Kambli यांचा सल्ला
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे घोषणा केली आहे की, आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विराट कोहली म्हणाला की, त्याने हा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतला आहे. कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे.
कोहली म्हणाला, की "मी टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय माझ्या जवळचे लोक मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला आहे." माझ्या कर्णधारपदाच्या काळात मी संघाला खूप काही दिले आहे. कामाचा ताण पाहता, मी 2021 च्या टी 20 विश्वचषकानंतर टी -20 स्वरूपातील भारताचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण एक फलंदाज म्हणून मी संघाला पाठिंबा देत राहीन.”