एक्स्प्लोर
T20 World Cup 2022 :टीम इंडियाची सरावाच्या मैदानाबाबत नाराजी, सरावाचं ठिकाण हॉटेलपासून ४२ किमी दूर
T20 World Cup 2022 : ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानला हरवून विजयी सलामी देणारी टीम इंडिया ऑस्ट्रेलियातल्या वास्तव्यात वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत आहे. टीम इंडियाच्या शिलेदारांना वेळेवर जेवणाची सुविधा मिळत नसल्यानं एबीपी माझाचे प्रतिनिधी सुनंदन लेलेंनी त्यांचा डबा कर्णधार रोहित शर्माला दिला. टीम इंडियानं सिडनीतल्या सरावाच्या मैदानावरुनही तक्रार केली आहे. टीम इंडियाच्या सिडनीतल्या हॉटेलपासून सरावाचं मैदान तब्बल ४२ किमी दूर आहे. त्याबाबत काही खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी पाहा























