एक्स्प्लोर
IND VS ENG लॉर्डस कसोटीत टीम इंडियाचा 151 धावांनी विजय, भारताची पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी
लॉर्डस कसोटीत टीम इंडियानं यजमान इंग्लंडचा 151 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 120 धावात संपुष्टात आला. भारताच्या मोहम्मद सिराजनं सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर जसप्रीत बुमरानं तीन आणि इशांत शर्मानं दोन विकेट्स घेतल्या. या विजयासह टीम इंडियानं पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे
आणखी पाहा























