IND Vs AUS : पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सनी मात
लोकेश राहुल आणि रवींद्र जाडेजानं रचलेल्या अभेद्य शतकी भागिदारीनं टीम इंडियाला मुंबईतल्या पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवून दिला. भारतानं या विजयासह तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव १८८ धावांत गुंडाळून खरोखरच कमाल केली होती. पण त्यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचीही पाच बाद ८३ अशी घसरगुंडी उडाली. त्या परिस्थितीत लोकेश राहुल आणि रवींद्र जाडेजानं १०८ धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राहुलनं ९१ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद ७५, जाडेजानं ६९ चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद ४५ धावांची खेळी उभारली. त्याआधी, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी तीन, तर रवींद्र जाडेजानं दोन फलंदाजांना माघारी धाडून ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.
![Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/5bbd601e1f3e17550d5b6f820bcc743a1737192593246718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Under 19 Asia Cup Women Team India : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/23/7a4b6016529075b92196e4c236010e781734892327252718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/13/c8b3596cb204dbc9d740c66a0a71e735173410171536790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/16/cde3982a5ec1ad0f77015a0abde3982f1723779828495261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/7c70c4ec8e85e646709f36ad40a0aa8d172015815874990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)