Ind vs NZ : टीम इंडियाची विजयी सलामी, भारताकडून न्यूझीलंडचा 5 विकेट्नी पराभव
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. जयपूरमधल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडचा पाच विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात न्यूझीलंडनं टीम इंडियाला विजयासाठी 165 धावांचं आव्हान दिलं होतं. रोहित शर्मानं लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादवच्या साथीनं रचलेल्या अर्धशतकी भागिदाऱ्यांच्या जोरावर भारतीय संघानं हा सामना जिंकला. रोहितनं 48, तर सूर्यकुमारनं 62 धावांची खेळी उभारली. त्याआधी, भुवनेश्वर कुमार आणि रवीचंद्रन अश्विननं प्रत्येकी दोन विकेट्स काढून न्यूझीलंडला सहा बाद 164 धावांत रोखलं.























