Ind vs SA : भारत आणि द.आफ्रिकेत होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याला आज सुरुवात
Ind vs SA match live streaming : भारत आणि दक्षिण आफ्रीका (Ind vs SA) यांच्यीतील कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना आफ्रिकेच्या केपटाउन येथे मंगळवारपासून सुरु होत आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 च्या बरोबरीत असून यामुळे भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. कारण ही कसोटी जिंकताच भारत मालिकाही जिंकेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा मान भारताला मिळेल. पण केपटाऊनमधला हा विजय भारताला सोपा नसून आतापर्यंत या मैदानात खेळलेल्या पाच पैकी पाच सामन्यात भारताला एकदाही विजय मिळवता आलेला नाही.
किती वाजता सुरु होणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना मंगळवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरु होईल. नाणेफेक दुपारी 1.30 वाजता असेल.























