एक्स्प्लोर
Women One Day Match : वन डे विश्वचषकात भारताचा तिसरा पराभव, ऑस्ट्रेलियाची भारतीय महिला संघावर मात
न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिलांच्या वन डे विश्वचषकात भारताला आणखी एका पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियानं भारताचा सहा विकेट्सनी पराभव करुन सलग पाचव्या विजयाची नोंद केली. या विजयासह ऑस्ट्रेलियानं विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं स्थानही निश्चित केलंय. या सामन्यात मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि यास्तिका भाटियाच्या अर्धशतकांमुळे ५० षटकात ७ बाद २७७ धावांची मजल मारली होती. पण एलिसा हिली आणि कर्णधार मेग लॅनिंगच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिलांनी २७८ धावांचा यशस्वी पाठलाग केला. हिलीनं ७२ तर लॅनिंगनं ९७ धावांची खेळी केली. दरम्यान भारताचा या स्पर्धेतला हा तिसरा पराभव ठरला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र

नरेंद्र बंडबे
Opinion






















