एक्स्प्लोर
IND vs PAK T20 World Cup : पाकची 20 षटकांत 159 धावांची मजल, भारतसमोर विजयासाठी 160 धावांचं आव्हान
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी १६० धावांचं आव्हान आहे. या सामन्यात भारतीय आक्रमणाचं दडपण झुगारून पाकिस्ताननं वीस षटकात आठ बाद १५९ धावांची मजल मारली. शान मसूद आणि इफ्तिकार अहमदनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेली ७६ धावांची भागीदारी पाकिस्तानच्या डावात मोलाची ठरली. इफ्तिकारनं ३४ चेंडूंत ५१ धावांची, तर शाननं ४२ चेंडूंत नाबाद ५२ धावांची खेळी उभारली. भारताकडून अर्शदीपसिंग आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. अर्शदीपनं सलामीच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला स्वस्तात माघारी धाडून कमाल केली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























