एक्स्प्लोर
Ashes मालिकेतल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा धुव्वा, एक डाव आणि 14 धावांनी ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय
अॅशेस मालिकेतल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुव्वा उडवलाय. एक डाव आणि १४ धावांनी ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवलाय. अवघ्या अडीच दिवसात ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी खिशात घातलीय. ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंडच्या तिखट माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. बोलंडने चार षटकात सात धावा देत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. बोलंडला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलंय. या विजयासह ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिका खिशात घातलीय. मालिकेतील उर्वरित दोन सामने आता केवळ औपचारिक राहिलेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















