एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : 2015 मध्ये आयसिसकडे आकर्षित, मौलवींच्या समुपदेशनानंतर भानावर, तरुणीची कबुली
आपण २०१५ मध्ये १२ वीला असताना आयसिसकडे ओढले गेलो होतो, मात्र मौलवींच्या समुपदेशनाने भानावर आलो, अशी कबुली पुण्यातल्या संशयित तरुणीने आज पत्रकार परिषदेत दिलीय. संबंधित तरुणी ही जम्मू काश्मीरमध्ये घातपात करेल, असा संशय तिच्याबद्दल व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी तिला अटक झाल्याचीही बातमी आली होती. या सगळ्याबद्दल तिने आज सविस्तरपणे पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. आपण १६ जानेवारीला आईसोबत श्रीनगरला गेलो होतो ते शिक्षणासाठीच. तिथे एका मैत्रिणीने माझी राहण्याची व्यवस्था केली, मात्र २५ जानेवारीला वृत्तपत्रातील पुण्यातील एक तरुणी घातपात करणार असल्याच्या बातमीनं मी हादरुन गेले...याबद्दल आईला सत्यता तपासायला सांगितली, पुणे पोलिसांशी संपर्क केला, काश्मीरातही विविध यंत्रणांनी याबद्दल माझी चौकशी केली, त्यातून काहीही हाती आलं नाही. तसंच मला काश्मीर पोलिसांनी अटक केली नव्हती तर, मीच त्यांच्यासमोर स्वत:हून हजर झाले, असंही या तरुणीने यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं.
महाराष्ट्र
Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी
Sudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहिती
Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement