Zero Hour Full EP : पाकला धडा शिकवण्यासाठी भारताचं मेगाप्लँनिग;भारताच्या लष्करानं कोणती तयारी केलीय?
Zero Hour Full EP : पाकला धडा शिकवण्यासाठी भारताचं मेगाप्लँनिग;भारताच्या लष्करानं कोणती तयारी केलीय?
: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) तपास करणाऱ्या एनआयएच्या हाती महत्वाचे पुरावे लागले आहेत. दहशतवाद्यांनी त्यांची हत्यारं बेताब खोऱ्यात लपवली होती. तसेच पहलगाम हल्ला लश्कर ए तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानचा कट होता असंही तपासात समोर आलं आहे. याचदरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हमास आणि पाकिस्तान समर्थित संघटनांचा संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. हमासने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतला होता. पाकव्याप्त काश्मीरमधील रॅलीत हमास सामील झाला होता. तसेच पहलगाम हल्ल्यतील संशयितही पाकव्याप्त काश्मीरमधील रॅलीत सहभागी होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री- 5 फेब्रुवारी 2025 रोजी हमासने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतला होता. या रॅलीला 'काश्मीर सॉलिडॅरिटी अँड हमास ऑपरेशन अल-अक्सा फ्लड कॉन्फरन्स' असे नाव देण्यात आले. पहलगाम हल्ल्याच्या नियोजनात सहभागी असलेले दहशतवादी या कार्यक्रमाला उपस्थित होते, अशी माहिती देखील मिळत आहे. या कार्यक्रमात हमासचे प्रतिनिधी डॉ. खालेद अल-कदौमी यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. इतर अनेक पॅलेस्टिनी दहशतवाद्यांसह पाकिस्तान समर्थित जिहादी संघटनांनी त्यात भाग घेतला. यावेळी, व्यासपीठावरून भारताविरुद्ध धमक्या देण्यात आल्या.

















