एक्स्प्लोर
Yavatmal Rain : यवतमाळमध्ये तुफानी पावसामुळे नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
कालपासून यवतमाळ जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु आहे. महागाव, आर्णी, घाटंजी, कळंब, दारव्हा दिग्रससह अनेक तालुक्यात जोरदार पाऊस कोसळलाय. जिल्हा आपत्ती विभागाकडून २६६ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. जिल्ह्यातील 40 हजार हेक्टरवरील पिकं पाण्यामुळे खरडून गेलीत. पैनगंगा, वर्धा, वाघाडी या नदीच्या काठावरील अनेक गावं पुराच्या वेढ्यात सापडली आहे. दुर्भा, दिग्रस, धानोरा या गावांचा पुरामुळं संपर्क तुटलाय. एकूणच तुफान पावसाचा जबदस्त तडाखा यवतमाळ जिल्ह्याला बसलाय.
आणखी पाहा























