Truth Social : Donald Trump स्वत:चं Social Media Platform सुरू करणार
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संदर्भात मोठी घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार आहेत, ज्याचे नाव 'ट्रुथ सोशल' आहे. ट्रम्पचे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरसारखेच असेल, ज्यावर वापरकर्ते त्यांचे विचार, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतील. ज्यांनी माझ्यावर बंदी घातली अश्या बिग टेक कंपनींच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण ट्रुथ सोशल मिडीया तयार केल्याचं ट्रम्प यांनी सांगीतलं आहे. आम्ही अशा जगात राहतो जिथे तालिबान ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे, तरीही तुमचे आवडते अमेरिकन अध्यक्ष शांत बसले आहेत. अशी खोचक टीकाही ट्रम्प यांनी केली.























