London Heathrow Airport Plane Landing Video : क्रॅश होता होता वाचलं विमान, थरारक व्हिडीओ व्हायरल
London Hithro Airport Plane Landing Video : क्रॅश होता होता वाचलं विमान, थरारक व्हिडीओ व्हायरल
लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अमेरिकन एअरलाईन्सचं एक विमान थोडक्यात बचावलं. ब्रिटनमध्ये सध्या गेरीट नावाचं चक्रीवादळ आलं आहे. त्यामुळे हवामान खराब आहे. हे विमान लँड होताना देखील वाऱ्याचा वेग प्रचंड होता. लँडिंगची परवानगी मिळाल्यानं पायलटनं लँडिंगची प्रक्रिया सुरू केली, पण वाऱ्यामुळे विमान प्रचंड हेलकावे खाऊ लागलं. एक क्षण असं वाटलं, तर पंख थोडे जरी अधिक कलंडले, तर विमान क्रॅश होईल. पण पायलटचं कसबच म्हणावं लागेल, ज्यामुळे त्यानं सर्व प्रवाशांची सुरक्षा अबाधित ठेवत विमान उतरवलं. जगभरात हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.























