एक्स्प्लोर
Dhaka : बांग्लादेशात पुन्हा मंदिरावर हल्ला, इस्कॉन राधाकांत मंदिराची तोडफोड
बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आलाय. राजधानी ढाक्यातील इस्कॉन मंदिरात जमावानं काल संध्याकाळी तोडफोड केली. ढाक्याच्या इस्कॉन राधाकांता मंदिरात सुमारे 200 जणांचा जमाव काल संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घुसला आणि त्यानं मंदिरात तोडफोड करून लूटही केली. या हल्ल्यात काहीजण जखमी झालेत. हाजी शफीउल्लाह याच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशातील कट्टरपंथीयांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात येतंय. बांग्लादेशात दुर्गापूजेच्यावेळी मंडपांमध्ये हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा झालेल्या हल्ल्यामुळे तिथल्या अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















