अद्यापही काही भारतीय Afghanistan मध्ये अडकले आहेत, भारत C-17 विमान पाठवण्याची शक्यता : ABP Majha
Afganisthan Crisis Update : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडण्यासाठी धावपळ करत आहेत. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी तालीबान समोर झुकण्यास नकार दिला आहे. अमरुल्लाह सालेह यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे. या मुद्द्यावर अमेरिकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा करणे व्यर्थ असून अफगाणी नागिरकांनी आपली लढाई स्वत: लढावी लागणार आहे, असे सालेह यांनी म्हटलंय.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर लोकांमध्ये भीती आहे. तिथले लोक इतर देशांमध्ये पलायन करु जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच अफगाणिस्तानात हजारो विदेशी लोक देखील अडकले आहेत. यात भारतासह अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, न्यूझीलंडसह अन्य काही देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत काही देशांनी आपापल्या नागरिकांना एअरलिफ्ट करुन आपल्या देशात आणलं आहे.