(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gangster Atiq Ahmed आणि Ashraf Ahmed यांची पोलीस बंदोबस्तात असतानाही खुलेआम हत्या
गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची पोलीस बंदोबस्तात असतानाही खुलेआम हत्या करण्यात आलीय... पोलीस या दोन्ही गँगस्टर भावांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात होते... वाटेत माध्यमांशा हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला... त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला.... यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले... ही सर्व घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये घडली... यानंतर तिन्ही आरोपींना स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं... या तिन्ही आरोपींनी अतिक, अशरफ यांची हत्या का केली, यामागे त्यांचा काय हेतू होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही... एखाद्या चित्रपटात शोभेल असं हत्येचं आणि त्यानंतरच्या गोळीबाराचं भयानक दृष्य कॅमेराबंद झालंय... अतिक आणि अशरफ यांना जेरबंद करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी जंगजंग पछाडलं होतं...विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी अतिक अहमदचा मुलगा असद एन्काऊंटरमध्ये मारला गेला होता...