Christmas Celebration Special Report : देशभरात नाताळचा उत्साह, चर्चमध्ये आकर्षक रोषणाई
Christmas Celebration : देशात आणि जगात ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस हा सण साजरा होत आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, मोठ्या संख्येने लोक आपापल्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांसह चर्चच्या ठिकाणी पाहोचले.देशभरात नाताळचा उत्साह, चर्चमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. कोरोना काळानंतर सगळेच सण अगदी उत्साहात साजरे केले जात आहेत. रांचीमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी 'ख्रिसमस कार्निव्हल' आयोजित करण्यात आला होता. कुलाबा, मुंबई येथील आर्चबिशप कार्निवल ओसवाल्ड्स येथे ख्रिसमस साजरा करण्यात आला. नाताळ सणानिमित्त मुंबईतील वांद्रे येथील माऊंट मेरी चर्च दिव्यांनी उजळून निघाले होते. मुंबईतील वांद्रे येथील ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी माऊंट मेरी चर्चला संपूर्णपणे लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी सजविण्यात आले























