(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Virus | चीनमधला कोरोना व्हायरस भारतात? रुग्णांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी?
चीनमध्ये पसरलेल्या भीषण कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण मुंबई, पुण्यात आढळून आल्याने खळबळ माजली आहे. चीनमधून महाराष्ट्रात परतलेल्या पाच जणांना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव असल्याच्या संशयाने त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. या पाच पैकी तीन जण मुंबईतील आहेत, तर दोन जण पुण्यातील आहेत. चीनमध्ये भीषण अशा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचे आतापर्यंत 25 बळी गेले आहेत.
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात तीन लोकांच्या विविध चाचण्या केल्या जात आहेत. हे तीन रुग्ण कल्याण, नालासोपारा आणि जोगेश्वरी येथील आहे. पाचही लोक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात चीनमधून भारतात परतल्यावर त्यांनी आजारपणाच्या लक्षणांची तक्रार केल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांना सगळ्यांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भात नागरिकांसाठी प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे.