Protest At Thane : Abdul Sattar यांच्या वक्तव्याच्या विरोधात ठाण्यात आंदोलन
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एक नव्या वादाला सुरुवात झालीय. सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गलिच्छ शब्द वापरल्यानं राज्यभर संतापाची लाट उसळलीय. सुप्रिया सुळे यांनी खोक्यावरून केलेली टीका अब्दुल सत्तार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. या टीकेवर प्रतिक्रिया देताना सत्तारांचा तोल गेलाय. दरम्यान अब्दुल सत्तारांनी शिवीगाळ केल्यानंतर आता राष्ट्रवादी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सत्तारांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील बंगल्याबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या निवासस्थानी तोडफोड केलीय. सोबतच राज्यभर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबई ठाण्यासह पुणे, नागपूर, बीडमध्ये राष्ट्रवादीची आंदोलन सुरू आहेत.






















