Mumbai Local Accident : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबईतील लोकल ट्रेनला बंद होणारे दरवाजे बसवणार
Mumbai Train Accident: मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना (mumbai local train accident) घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. यामुळे 8 प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत आतापर्यंत 6 प्रवाशांचा मृ्त्यू झाला आहे. तर दोन प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातील पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.
मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी सगळी घटना सांगितली-
लोकलमधून फूटओव्हरवरुन ट्रव्हल करत होते. यातील 8 लोकांची टक्कर झाली. एका प्रवाशाने माहिती दिली आहे, की दोन ट्रेनमधले लोकांना बॅग लागल्याने हे पडलेत. सकाळी 9.30 वाजता ही दुर्घटना घडली आणि 9.50 पर्यंत ॲम्युबलन्स दाखल झाल्या आहेत आणि रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेली आहे. मुंब्रा आणि दिवा दरम्यान ही घटना घडली. अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागला आणि धक्का लागला त्यामुळे ही 8 लोकं खाली पडलीत. रेल्वेने उपाययोजना करण्यासंदर्भातच नव्या लाईनचे नियोजन केले आहेत. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत. कार्यालयांना देखील विनंती केली होती की कार्यालयातील वेळेमध्ये केले तर चांगलं होईल. लोकांचा देखील सहयोग गरजेचा आहे, उपाययोजना आपण करत आहोत. पश्चिम आणि मध्यमध्ये अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. मध्य रेल्वेची फ्रिक्वेन्सी अधिक आहेत, ब्रिज आणि टनेल अधिक आहेत.























