Jitendra Awhad Arrested : वैद्यकीय तपासणीसाठी जितेंद्र आव्हाड सिव्हिल रुग्णालयात
जितेंद्र आव्हाड यांची आजची रात्र तुरुंगात जाण्याची शक्यता आहे...विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आलीय... आणि आता आव्हाडांना वैद्यकीय चाचणीसाठी सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलंय... जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता... यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.. तर दुसरीकडे अभिनेत्री केतकी चितळे यांनी देखील आता या प्रकरणात उडी घेतलीय... आणि आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय...























