अमेरिकेच्या टेक्सासमध्ये हिमप्रलयामुळे दीड कोटी नागरिकांचे हाल, बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये भर हिवाळ्यात दीड कोटी नागरिकांचा घसा कोरडा पडण्याची वेळ आली आहे. टेक्सास राज्यात 10 फेब्रुवारीला आलेल्या हिमप्रलयामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाला आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी पडली आहे. या हिमप्रलयामुळे वीज पुरवठा करणाऱे ग्रीड बंद पडले आहेत. त्यामुळे गेल्या दहापासून टेक्सासचा वीज पुरवठा बंद पडला आहे. वीज सुरू नसल्यामुळे दहा दिवसांपासून दीड कोटी नागरिकांना हिटरशिवाय जीवघेण्या थंडीत दिवस काढावे लागत आहेत. तर, पाण्याच्या पाईपलाईन बर्फ गोठल्यामुळे फुटल्या आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा बंद झालाय. पाणी येत नसल्यानं लोकांवर सध्या बर्फ वितळवून पाणी प्यायची वेळ ओढावली आहे. तर, ह्युस्टनमध्ये स्टेडिअमबाहेर पाण्याची बॉटल घेण्यासाठी शेकडो लोकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होता.






















