Pandhapur:शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात मोठा उत्साह, रुक्मिणी मातेसाठी मारवाडी पोशाख
शारदीय नवरात्र महोत्सवाला विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे.... आज दुसऱ्या माळेला रुक्मिणी मातेला मारवाडी पोशाखात आणि नखशिखांत दागिन्याने नटविण्यात आले..विठुराया पारंपरिक हिरेजडित दागिन्याने नटला... आज रुक्मिणीमातेला मारवाडी पोशाख करताना भरजरी लाल , पिवळ्या रंगाचा घागरा आणि हिरव्या रंगाच्या चोलीवर सोनेरी रंगाची चुनरी असा देखणा पोशाख परिधान करण्यात आला होता.. यावर नखशिखांत मारवाडी पद्धतीतील अतिशय मौल्यवान अशा हिरे मोत्याच्या दागिन्याने नटविण्यात आले होते. रुक्मिणी मातेला 22 प्रकारचे हिरेजडित दागिने परिधान करण्यात आले... आजचा रुक्मिणी मातेचा हा मारवाडी पोशाख पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती .























