Pandharpur Mandir Darshan for disable : पंढरपूरच्या मंदिरात अपंगांनी दर्शन घ्यायचं कसं?
पंढरपूरचं विठ्ठल मंदिर म्हणजे कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान.. वर्षभरात इथं लाखो-करोडो भाविक दर्शन घेतात. असं असूनही व्हीलचेअर गाभाऱ्यापर्यंत नेण्याची सोय अजूनही या मंदिरात नाही. जे अपंग आहेत, किंवा आजारी असल्यामुळे व्हीलचेअरवर आहेत, त्यांना दर्शन घेण्यात प्रचंड अडचणी येतात.
नागपूरचं एक कुटुंब विठ्ठल मंदिरात आलं होतं.. कुटुंबातील आजी व्हीलचेअरवर आहेत, त्यांना दर्शन घ्यायचं होतं.. व्हीलचेअर गाभापर्यंत नेताना कुटुंबाला बराच त्रास झाला.. मंदिर संमितीकडे निधीची कमी नाही.. कमी आहे ती फक्त इच्छासक्तीची.. विठ्ठल मंदिर लवकरात लवकर DISABLE-FRIENDLY झालं पाहिजे, अशी मागणी भक्तांसह एबीपी माझा देखील करत आहे.























