(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची संततधार सुरूच, भातशेती धोक्यात : ABP Majha
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. ऐन भात कापणीच्या हंगामात पाऊस पडत असल्याने बळीराजा चिंतेत आहे... सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आलाय... तर पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पंढरपूरमधील मंगळवेढा तालुक्यातही अवकाळी पावसाने थैमान घातलंय.. 35 गावांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय त्यामुळे काढणीला आलेल्या मका, बाजरी या पिकांचं मोठं नुकसान झालंय...सांगलीतल्या जत तालुक्यातील उमदी भागात अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांसह इतर पिकांचंही नुकसान झालंय... तर कोल्हापुरातील राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात रिमझिम पाऊस झाल्याने भात कापणीला फटका बसलाय...