(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#BiharElection बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची युती? पवार- ठाकरेंमध्ये वर्षा निवासस्थानी खलबतं
कोरोना काळात देशातली पहिली निवडणूक होणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल जाहिर होणार आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. बिहार विधानसभेत एकूण 243 मतदारसंघ आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत सीपीएम-4, सीपीआय-6, सीपीआय(माले) -19, काँग्रेस-70 आणि राजद – 144 जागांवर लढणार आहे. 2015 च्या विधानसभा निडवणुकीत राजद-101, जेडीयू – 101 व काँग्रेस 41 जागांवर निवडणूक लढली होती. या निकालानंतर बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलं. महाआघाडीचा घटक पक्ष जेडीयू भाजपसोबत गेला. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू मुख्य चेहरा आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल.