(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SHIRDI : शिर्डी नगरपंचायत होणार नगरपरिषद
शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषद करण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न सुरू होते, त्यासाठी कोर्टात लढा सुरू होता. तर दुसरीकडे नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्यावर ग्रामस्थांसह, नेत्यांनीही निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरपंचायत निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही अधिसूचना सरकारने काढली आहे. ३० दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती घेण्यास मुदत देण्यात आली आहेनगरपंचायत निवडणुकीवर सर्वपक्षीय नेत्यांनी बहिष्कार टाकला होता.
तर लोकसंख्या निकष लावत नगरपंचायतची नगरपरिषद करण्याची मागणी अखेर पूर्ण करण्यात आलीय . नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सरकारने अधिसूचना काढलीय. यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात ही लढा सुरू होता.
आता नगरपंचायत निवडणुक रद्द होणार का याकडे आता शिर्डीकरांचे लक्ष आहे.