Satara Couple | पत्रिकेतील गुणही जुळले, बारावीच्या परीक्षेतही नवरा-बायकोला सेम टू सेम मार्क! साताऱ्याची अनोखी लव्ह स्टोरी
प्रेम जुळवूण कुंडली जुळवणं आणि कुंडली जुळल्यानंतर दिलेल्या परीक्षेचे मार्क जुळणं, हे थोड अतिच होतंय ना? हो पण असं घडलय. साताऱ्यातील सांगवड आणि गणेवाडी गावातील प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याच्या जीवनात. प्रेम करुन कुंडली जुळवत लग्न करणाऱ्या या नवदाम्पत्याना बारावीच्या निकालात सेम टू सेम मार्क मिळालेत.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील आदिक कदम आणि पाटण तालुक्यातीलच सांगवड गावातील किरण सुर्यवंशी या दोघांचे एकमेकावर प्रेम होते. मुलगी बारावीत तर मुलाने 11 वी मधूनच शिक्षण थांबवले होते. या दोघांच्या प्रेमामध्ये एक दरी तयार झाली होती. मुलीने मुलाला अट टाकली तू बारावीची परिक्षा दे तरच मी तुझ्याशी लग्न करेन, आणि बारावीचा रिझल्ट पाहता दोघांनाही तंतोतंत मार्क मिळाल्याचं समोर आलं.






















