एक्स्प्लोर
Sangli Lumpy : सांगली जिल्ह्यात पुन्हा लम्पीचं सावट, लम्पीमुळं बैलगाडा शर्यतीला बंदी
सांगली जिल्ह्यात पुन्हा लम्पी आजाराचे सावट निर्माण झालंय. या प्रार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून जनावरांचे आठवडी बाजार, बैलगाडा शर्यतीला बंदी घालण्यात आलीय. लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. गेल्या ११ दिवसांमध्ये १ हजार ९२ जनावरं बाधित झाली आहेत. यातील २७ जनावरांचा मृत्यू झालाय. त्यामुळं खबरदारी म्हणून जिल्ह्यात होणारे जनावरांचे आठवडी बाजार देखील बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय बैलगाडा शर्यतींवरही बंदी असेल. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिलेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
महाराष्ट्र
राजकारण






















