एक्स्प्लोर
Krishna River : कृष्णा नदीतील प्रदूषणाबाबत पालकमंत्र्यांची बैठक, कारखान्यावर कारवाईचा इशारा
कृष्णेतील प्रदूषणामुळे हजारो माशांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या बातमीने राज्यात खळबळ उडाली होती. ABP माझाने या प्रदूषणाविरोधात जोरदार आवाज उठवल्यानंतर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने संबंधित कारखान्यावर कारवाई केली होती... आता या प्रदूषणाबाबत पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी कृष्णा नदीत प्रदूषण करणाऱ्या कारखान्याला क्षमा करणार नाही, असा इशारा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा प्रशासन, महापालिकेचे अधिकारी आणि प्रदूषण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
क्रिकेट
महाराष्ट्र
विश्व






















