Ravindra Chavan Mumbai Goa : महामार्गावर एसटी बंद पडल्यानं मंत्री रविंद्र चव्हाण वाहतूक कोंडीत अडकले
बुलेटिनची सुरवात करूया मुंबई गोवा महामागावरील बातमीने करूया... १५ हजार कोटींचा खर्च करूनही मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झालेला नाही. शिवाय खड्डे आहेतच. त्यामुळे कोकणात जाणारे प्रवासी मेटाकुटीला आलेत. त्यामुळे काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण रस्त्याच्या सतत आढावा घेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज ते याच प्रयत्नात असताना त्यांनाच वाहतूक कोंडीचा फटका बसला. याच महामार्गावर एस.टी. बंद पडल्यानं वाहतूककोंडी झाली. त्यानंतर सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाली. मात्र या परिस्थितीत खुद्द रविंद्र चव्हाण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा मार्गावर कोकणवासीय कसा प्रवास करत असतील याचा अंदाज मंत्री महोदयांना आला असावा, अशी चर्चा होतेय.























