एक्स्प्लोर
Advertisement
Police on Vinayak Mete Accident : विनायक मेटेंच्या अपघाताबाबत पोलिसांकडूम प्राथमिक माहिती समोर
Vinayak Mete Accident News : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
रायगड
राजकोट शिवरायांचा पुतळा दुर्घटनाप्रकरणी वैभव नाईकांची चौकशी
Joshi Wadewale Fight Mangaon : जोशी वडेवाल्यांची मुजोरी..गरोदर महिलेला केली मारहाण?
Aanvi Kamdar Death : Kumbhe Waterfall जवळ रीलस्टारचा मृत्यू;रेस्क्यू टीमने लावली जीवाची बाजी पण..
Raigad Rain : रायगड जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Raigad Heavy Rain : रायगडमध्ये ढगफुटी, महादरवाजातून पाण्याचं रौद्र रूप शिवभक्त थोडक्यात बचावले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement