एक्स्प्लोर
Nitin Desai Death : नितीन देसाई मृत्यू प्रकरणी एडलवाईस कंपनीचे तीन कर्मचारी चौकशीसाठी हजर
Nitin Desai Death : नितीन देसाई मृत्यू प्रकरणी एडलवाईस कंपनीचे तीन कर्मचारी चौकशीसाठी हजर नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी एडलवाईस कंपनीचे 3 प्रतिनिधी खालापूर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. त्यांच्या हातात कागदपत्रांचे गठ्ठे देखील होते. मंगळवारी देखील त्यांची चौकशी झाली होती. मात्र तेव्हा काही कागदपत्र मिसिंग आहेत, असं पोलिसांनी सांगितलं, आणि म्हणून आज पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. देसाई यांनी एकूण १८० कोटींचं कर्ज एडलवाईसकडून घेतलं होतं. व्याजासह एकूण देणं १५२ कोटी इतकं होतं. याच कर्जाप्रकरणी एडलवाईजचे अधिकारी माझ्यावर दबाव टाकत आहेत, असा आरोप देसाई यांनी आपल्या व्हॉईस नोेटमध्ये केला होता.
आणखी पाहा























