Pune : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील विजेते शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर ABP माझावर
उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच आयोजित सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतल्या चार पदकविजेत्या पैलवानांचं पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या सहा पैलवानांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदकांची कमाई केली. त्यापैकी सुवर्णविजेत्या शिवराज राक्षे, रौप्यविजेत्या हर्षवर्धन सदगीर, तसंच कांस्यविजेत्या आबासाहेब अटकले आणि वेताळ शेळके यांचं तालमीतल्या लहानमोठ्या पैलवानांकडून फुलं उधळून स्वागत करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातल्या या पैलवानांना अर्जुनवीर काका पवारांचं मार्गदर्शन लाभलं आहे. या तालमीच्या विक्रम कुऱ्हाडे आणि प्रीतम खोत यांनी ग्रीको रोमन कुस्तीत कांस्यपदकांची कमाई केली आहे.























