Sayaji Shinde Honey Bee Attack : अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला
Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर मधमाशांचा हल्ला (Honeybee Attack) झाला आहे. सयाजी शिंदे यांनी पुणे बंगळुरु (Pune-Bangalore Highway) महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करत होते. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. Company logo Ads by READ MORE 00:03 / 02:10 पुणे बेंगलोर महामार्गाचे रुंदीकरण सुरु असल्यामुळे तेथील झाडे वाचवण्यासाठी ते तासवडे येथे स्वतः उपस्थित होते. यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर सयाजी शिंदे यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवण्यात आलं. सयाजी शिंदे यांनी एबीपी माझाला माहिती दिली की, ते सुखरुप आहेत. या घटनेत सयाजी शिंदे यांना दुखापत झालेली नाही.





















