Who Is Ajay Taware : दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलणारा डॉ. अजय तावरे कोण?
Pune Kalyani Nagar accident : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडिल विशाल अग्रवाल यांना चार दिवसांपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघेही आता 31 मे पर्यंत पोलीस कोठडी असणार आहे. कल्याणीनगर येथील अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायलाही अटक करण्यात आलेय. त्यांनी ब्लड सँपलमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी कोर्टानं तावरे आणि हळनोर यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं होते. ड्रायव्हरचं अपहरण, मुलाचा गुन्हा स्वतःवर घ्यावा, अन तसं न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली. आजोबा सुरेंद्रकुमार आधी अटकेत होते, विशाल अग्रवालला याप्रकरणी आज अटक दाखवण्यात आलेली आहे. कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद झाला. सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यामध्ये खडाजंगी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं आरोपी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टामध्ये युक्तीवाद काय काय झाला ?
प्रशांत पाटील - वकील ( बचाव पक्ष )
तीन वेगवेगळ्या एफआयर या एकाच केसमध्ये झाल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबत छेडछाड झाली आहे की नाही हे त्यांना बघायचं आहे. अग्रवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत, त्यात अजून काय सर्च करण्यासारखं नाही. ड्रायव्हरने त्याच्या पत्नीसह घरी येत आमचे मोब लिंचींग होइल असं सांगितलं. यासाठी तो घरी आला. नंतर फक्त त्याची बाईक घेण्यासाठी अग्रवाल यांच्या घरी आला होता.
सरकारी वकील युक्तीवादावेळी काय म्हणाले ?
अपघाताची घटना वेगळी आहे. आम्हाला याप्रकरणाचा जॉइंट तपास करायचा आहे. मोबाईल तपास सुरू आहे. या सगळ्यांची पोलीस कोठडी गरजेची आहे. कारण उर्वरित प्रकरणात आणखी लोक सहभागी असल्याचं आम्हाला संशय आहे. त्यासाठी चौकशी करणं आवश्यक आहे