Rohit Pawar on ED Notice : ईडीची नोटीस ते शरद मोहोळ प्रकरण; भाजप, देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
Rohit Pawar on ED Notice : ईडीची नोटीस ते शरद मोहोळ प्रकरण; भाजप, देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
पुणे: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती अॅग्रोवरील ईडीच्या कारवाईनंतर (ED Action On Baramati Agro) आता राज्याचं राजकारण तापत असल्याचं चित्र आहे. मी काही चुकीचं केलं असतं तर देशात परत आलो नसतो, अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी (Rohit Pawar) दिली. शुक्रवारी ईडीने बारामती अॅग्रोवर धाड टाकली होती. त्यानंतर रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला.
गेल्या सात दिवसामागे दिल्लीला कोण कोण गेलं होतं त्याची माहिती घ्या, त्यामध्ये भाजपचे आणि अजित पवारांचे कोण सोबती गेले होते याची माहिती घ्या. त्यानंतर सर्व घटनाक्रम लक्षात येईल असं रोहित पवार म्हणाले. आपण काही चुकीचं केलं असतं तर देशात परत आलोच नसतो, अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो असंही रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, रोहित पवारांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. रोहित पवारच्या प्रश्नाला उत्तर द्यावं, इतका तो मोठा झालेला नाही, तो बच्चा आहे, त्यावर माझे प्रवक्ते बोलतील असं ते म्हणाले.






















