Pune Porsche Car Accident : मोबईल, कार ते फरार ...विशाल अग्रवालची अडचण वाढवणारे पाच मुद्दे
Pune Porsche Car Accident विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी
पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील विशाल अग्रवाल याला तीन दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाकडून देण्यात आली आहे.
पुणे येथील विमान नगर भागात एका अल्पवयीन मुलांकडून भरदा वेगाने मद्यप्राशन करून गाडी चालवण्यात आली व त्यामध्ये दोन निष्पा तरुण व तरुण यांना आपला प्राण गमवावा लागला. या घटनेनंतर गेल्या 48 तासांमध्ये तपास यंत्रणे करून ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे होता तसे न होता हा तपास करताना संशयास्पद घडामोडी झाल्या. आरोपी मुलास वाचवण्याकरता सत्ताधारी पक्षातील विशेष काही लोकप्रतिनिधी व तपास यंत्रणातले अधिकारी यांच्या संगनमताने आरोपी मुलाला वाचवण्याकरता व त्याला जामीन मिळण्याकरता मुद्दाम परिस्थिती निर्माण करण्यात आली. पुण्यातील पब मध्ये अल्पवयीन मुलाला मध्य प्राशन करून देण्यापासून ते त्या मुलाला जामीन मिळेपर्यंत सर्व यंत्रणा स्वतः करत होती तीच मुळात संशयास्पद होती. तक्रारी मध्ये बदल रक्त तपासणी रिपोर्ट मध्ये बदल अशा विविध घडामोडी संशयास्पद या प्रकरणात करण्यात आला. या अपघातामध्ये दोन होतकरू तरुण व तरुणी यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना ज्या पद्धतीने प्रकरण हाताळण्यात आलं त्याबाबत महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. अशा वेळेस या संपूर्ण प्रकाराची चौकशी एसआयटी मार्फत व्हावी ही मागणी आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मां. निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजेंद्र वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.