Pimpari Chinchwad Water Logging : हिंजवडी आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरुप, सखल भागात पाणी
Pimpari Chinchwad Water Logging : हिंजवडी आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरुप, सखल भागात पाणी
पिंपरी: राज्याच्या काही भागामध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी आलेल्या दमदार पावसामुळे आयटी पार्क हिंजवडी (Hinjewadi Heavy Rain) हा परिसर वॉटर पार्क हिंजवडी झाला आहे. फक्त काही मिनिटे आलेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी (Hinjewadi Heavy Rain)परिसरातील रस्ते पाण्याने तुंबले आहेत. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाकी वाहन देखील वाहून गेले आहेत. पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्याने आज आयटी पार्क हिंजवडी वाटर पार्क हिंजवडी झाल्याची वेळ ओढवली आहे. टेल्को रोड, लांडेवाडी, हिंजवडी या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.(Hinjewadi Heavy Rain)
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लांडेवाडी आणि भोसरी एमआयडीसी हद्दीत देखील काही मिनीटांच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी 10 वाजता काही मिनिटांसाठी झालेल्या पावसाने प्रशासनाची पोलखोल झाल्याचं समोर आलं आहे. दोन्ही ठिकाणी नाल्यांमुळे ही अवस्था निर्माण झाली आहे. पावसाळी नियोजनाच्या नावाखाली बैठका आणि त्याच्या प्रेसनोट एवढंच सुरू असल्याच्या चर्चा आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावरती संताप व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या























