(Source: ECI | ABP NEWS)
Pune : पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गर्दी, आयोजक प्रशांत जगताप यांना अटक आणि नंतर सुटका
पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल पार पडले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. याची दखल आता पोलिसांनी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके त्यांच्यासह शंभर ते दीडशे महिला आणि पुरुष पदाधिकारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























