Pune Crime : पुण्यात दिवसाढवळ्या गँगवॉर, एका गुंडासह दोघांचा मृत्यू; सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गँगवारचा थरार पहिला मिळाला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती मिळाली की, वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युध्द भडकल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष जगताप दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर चर्चा करत होते. रस्त्याच्या बाजूने आलेल्या चार ते पाच जणांनी संतोष जगताप व त्यांच्या अंगरक्षकावर घातक हत्याराने हल्ला चढविला तसेच गोळीबारही केला. या हल्ल्यात संतोष जगताप व त्यांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाले तर जखमी अवस्थेत संतोष जगताप यांनी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देताना गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला तर उर्वरित पळून जाण्यात यशस्वी ठरले.
महत्त्वाच्या बातम्या























