Prakash Ambedkar | 'पुतळ्याची गरज नाही', डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत प्रकाश आंबेडकरांची भूमिका
इंदू मिलमध्ये स्मारकाऐवजी लोकोपयोगी वास्तू उभारा असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे. माझा पुतळा उभारण्याला विरोध आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. पुतळा उभारण्याऐवजी एक बौध्दीक विचार केंद्र निर्माण व्हावं अस मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. तसंच इंदू मिलमधील स्मारकाच्या कार्यक्रमाला जाण्यात मला रस नाही असंही त्यांनी म्हटलं.
याआधी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ही जागा इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. या जागेबाबतच्या अटलजींच्या पत्राचं अध्ययन मुख्यमंत्र्यांनी करावं, असंही आंबेडकर म्हणाले. मात्र इथल्या राजकारण्यांनी ही जागा पुतळ्यासाठी वापरली. त्यामुळे न्यायालयाला मी विनंती करतो की, त्यांनी पुतळयाचा आणि सुशोभीकरणाचा निधी वाडिया रुग्णालयासाठी वर्ग करण्याचा आदेश द्यावा असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.