Shivsena-MNS | उद्धव-राज एकत्र येणार? डोंबिवलीतील पलावा पुलासाठी शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकजूट
Shivsena-MNS | उद्धव-राज एकत्र येणार? डोंबिवलीतील पलावा पुलासाठी शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकजूट
एकीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. दोन्ही बंधूंनी याबाबत सकारात्मक वक्तव्यही केलं. मात्र त्याआधी आज दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मात्र डोंबिवलीतल्या पलावा इथल्या पुलासाठी एकत्र आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मिळून रखडलेल्या पलावा पुलाचा पाहणी दौरा केला. शिवसेना - मनसे पक्षाच्या विजयाच्याही घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल करण्यात आला. संथगतीने सुरू असलेल्या कामावरही टीका करण्यात आली. मनसेने याबाबत बॅनरबाजी केलीय. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिला. मात्र दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. अर्थात मोठ्या स्तरावर दोन्ही बंधू एकत्र आले तर आनंदच होईल असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.





















