Santosh Bangar यांचा ताफा रोखला, बांगर यांच्यासमोरच दोन गटात हमरीतुमरी ABP Majha
Santosh Bangar यांचा ताफा रोखला, बांगर यांच्यासमोरच दोन गटात हमरीतुमरी ABP Majha
हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे सध्या मसाई मातेची यात्रा सुरू आहे या यात्रेत कोणताही राजकीय पुढारी बोलावलं जातं नसल्याची परंपरा आहे या यात्रेला आमदार बांगर यांनी उपस्थिती लावल्याने गावकऱ्यांनी आमदार बांगर यांना रोखले गावातील यात्रेला राजकीय स्वरूप नको आहे या अपेक्षेने गावकऱ्यांनी आमदार बांगर यांना रोखले होते त्यावेळी गावातील शिंदे आणि ठाकरे गट समोरासमोर आले आणि यांच्यात बाचाबाची झाली या घटनेमुळे आमदार संतोष बांगर यांचा ताफा काही काही वेळासाठी गावकऱ्यांनी रोखला होता या वेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता.
यात्रेचे मानकरी असलेले अशोकराव करे यांनी आमदार बांगर यांना आगोदरच विनंती केल्या नंतर सुध्धा बांगर गावात आल्याने हा वाद झाल्याचे यात्रेचे मानकरी आसलेले आशोकराव करे यांनी सांगितले आहे बांगर यांच्याशी संपर्क साधला आसता आसा कोणताही वाद झाले नसल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले आहे.