Sanjay Raut PC : भाजपला काम-धंदा नाही, हिंदू-मुस्लीम दंगे भडकवतंय, राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद
मालेगाव महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यातच टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समकक्ष मानले पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केले होते. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान (Tipu Sultan) यांनी त्याच समकक्ष काम केलं आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समकक्ष मानले गेलं पाहिजे, असे मत त्यांनी मांडले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यभरातुन निषेध केला जात आहे. दरम्यान, याच मुद्दयांवर बोट ठेवत भाजपनेही काँग्रेसवर प्रहार केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून या विषयावर भाष्य करण्यात आलंय. यात भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे.
सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?
'नायक' मानणे हे सर्वस्वी चूक आहे. भाजपने राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपूचा गौरव केला व आता भाजपने आपल्या फायद्यासाठी टिपूची कबर खणली आहे, पण त्या कबरीत तेच पडले आहेत. मुंबईतील रस्त्यांना 'टिपू'चे नाव द्यायचा प्रस्ताव भाजपचाच होता. विद्यमान महापौर रितू तावडे त्याच्या साक्षीदार आहेत. तरीही टिपूच्या नावाने त्यांचे टिपऱ्या बडवणे सुरूच आहे. निर्लज्ञ्जम सदासुखी























